अमित शहांचा ‘पटक देंगे’ हा इशारा शिवसेनेला नव्हता; रावसाहेब दानवेंचा खुलासा

0
917

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा ‘पटक देंगे’ हा इशारा शिवसेनेला नव्हता. तर भाजपच्या विरोधात उतरणाऱ्या विरोधकांना होता, असे खुलासा करून  भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब  दानवे यांनी  या विषयावर पडदा टाकण्याचा आज (सोमवार) येथे प्रयत्न केला.   

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दानवे  बोलत होते. एका सभेत बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेशी युती झाली नाही तरी त्यांना आपटले जाईल, असे म्हटले होते. याबाबत दानवे यांना प्रश्न केला असता त्यांनी हा इशारा शिवसेनेला नव्हता. तर इतर विरोधकांना होता, असे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मी राज्यातील मतदार संघाचा आढावा घेत आहे. आतापर्यंत ३६ लोकसभा मतदार संघात दौरा केला आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघात एक प्रसारक नेमला आहे. संघटनेच्या बळावर पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दिसतील, इतकी आमची निवडणूक जिंकण्याची तयारी झाली आहे, असे दानवेंनी यावेळी सांगितले.