अमितच्या लग्नासाठी आलेल्या काँग्रेस नेत्याने राज ठाकरेंशी केली खासगीत चर्चा

0
1197

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यासाठी काँग्रेस नेते व खासदार अहमद पटेल यांनी  उपस्थिती  लावली होती. यावेळी अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्यात २० मिनिटे खासगीत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे देखील महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राज ठाकरेंनी या विवाहसोहळ्यासाठी राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिले होते. या विवाहसोहळ्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वतीने अहमद पटेल हे सहभागी झाले होते. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांची  सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजलेले नाही. मात्र,  सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसेचा महाआघाडीत समावेश करण्यासंदर्भात  या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे.