अमरावतीतील भाजप नेत्याची वेबसाईट पाकिस्तानने केली हॅक; वेबसाईटवर दिसत आहे “पाकिस्तान जिंदाबाद”

0
497

अमरावती, दि. ४ (पीसीबी) – अमरावती जिल्हाचे भाजप नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची वेबसाईट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून एका पाकिस्तानी हॅकरने ही वेबसाईट हॅक केल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रवीण पोटे मंत्री झाल्यानंतर  वेबसाईट तयार करण्यात आली होती. या वेबसाईटवर त्यांचे दौरे, कार्यक्रम , महतवाच्या घोषणा याबाबतची माहिती  असे.  आता मात्र या वेबसाईटला भेट दिली तर प्रवीण  पोटे यांच्या वेबसाईटवर पाकिस्तान जिंदाबाद असा संदेश दिसून येतो. ही वेबसाईट पूर्णपणे हॅक झाली असून ती आता हॅकरच्या ताब्यात आहे.

पोटे यांचे स्वीय सहायक अमोल काळे यांनी या संबंधी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. मोहम्मद बिलाल अस नाव सध्या यावर येत आहे तर ३७० कलम रद्द केल्या प्रकरणी आणि पाकिस्थान जिंदाबाद असा मजकूर याच्यात लिहला आहे.