अभिमानास्पद झेप; महाराष्ट्रात २३० ते २४० वाघ

0
805

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  देशभरात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. तर महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, अशी माहिती व्याघ्रगणना अहवालातून समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा अहवाल दिल्लीत सादर करण्यात आला.

या अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे.

दरम्यान, कोयना, चांदोली अभयारण्यमधील राखीव जागा व राधानगरी, तिलारी जंगलाचा परिसर हा ‘टायगर कॅरिडॉर’म्हणून ओळखला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ‘कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते पुढे गोवा आणि कर्नाटकातील जंगल असा वाघांच्या संचाराचा मार्ग आहे. हा जंगल परिसर वाघासाठी पोषक आहे. येथे मानवी उपद्रव व घुसखोरी कमी आहे.