अभिनेत्री हेमा मालिनींचा गव्हाच्या शेतात जाऊन मतदारांशी संवाद

0
613

नवी दिल्ली , दि. १ (पीसीबी) – मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार  ‘ड्रीम गर्ल’   अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शेताच्या बांधावर जाऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.  हेमा मालिनी  यांनी मथुरातील गोवर्धन परिसरातील एका गव्हाच्या शेतात  जाऊन महिला मतदारांशी संवाद साधला.

यावेळी हेमा मालिनी यांनी  शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली. त्यानंतर कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या. हेमा मालिनी यांच्या या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु  झाली आहे.  हेमा मालिनी यांचे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल  झाले आहेत.

हेमा मालिनी यांनी शेतातील महिलांसोबत  संवाद साधला. हेमा मालिनी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी  झाली होती.  हेमा मालिनी यांच्यासारखी अभिनेत्री  शेतात जाऊन काम करते, हे पाहायला खुप छान वाटते. मात्र,  हे चित्र केवळ निवडणुकीतच पाहायला मिळते. त्यामुळे ही केवळ स्टटंबाजी  आहे, अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे.