अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

0
473

दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ३७ लाख रुपयांची मोठी रक्कम घेऊन कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह टॅलेंट फुल ऑन कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर आणि अॅडगर सकारिया या चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरादाबादच्या कटघर परिसरात २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी ३० सप्टेंबर रोजी दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आयोजकाकडून ३७ लाख रुपयांची मोठी रक्कम घेतली होती, मात्र सोनाक्षीने त्या कार्यक्रमाला हजेरी तर लावली नाही तसेच दिलेले पैसेही परत केले नाही. यामुळे आयोजक प्रसाद शर्मा यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी विष प्राशन केले होते. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.