अधिवेशनात अडचणीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न; पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही – धनंजय मुंढे

0
418

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – सरकार मला नेहमी अधिवेशनाच्या काळातच अडचणीत  आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  म्हटले आहे.

जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून दिलेला ४० लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंविरोधात डिसेंबरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती  राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर  दिली आहे. त्यामुळे मुंडे  अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यावर मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम आरक्षणाचा विषय सरकारसमोर आहे. तसेच राज्यातील दुष्काळ यावरही विरोधी पक्षांनी अधिवेशनात सरकराला घेरण्याची तयारी केली आहे.    मुंडे यांची अधिवेशनातील आक्रमक भाषणे याआधी गाजली आहेत. विविध प्रश्नांवरून मुंडे यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या विरोधातील प्रकरण बाहेर काढले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.