अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे..

0
411

नागपूर, दि. ४ (पीसीबी) : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल बस्तुस्थिती लक्षात येईल, उसं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलंय.

‘प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे’, अशी आक्रमक मागणी बावनकुळे यांनी केलीय.
‘आरएसएस, विश्व हिंदू परिषदसुद्धा तालिबानी वृत्तीचेच आहेत, हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरतात की या हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या, हिंदू समाजाची क्षमा मागा. नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला जाईल. हे सुद्धा मी सांगू इच्छितो’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांना इशारा दिलाय.
जावेद अख्तर यांच्याकडून आरएसएसची तालिबानशी तुलना
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
‘मुस्लिमांना मारहाण पूर्णपणे पूर्ण तालिबानी होण्यासाठीची ड्रेस रिहर्सल’
एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.’
आरएसएस आणि तालिबानमध्ये फरक कुठे आहे?
जावेद अख्तर म्हणाले, ‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे.’