अखेर पार्किंग मध्ये करावे लागले अंत्यसंस्कार !

0
219

हरियाणा,दि.२८(पीसीबी) – देशातील कोरोनामुळे परिस्थिती भयावह बनत चालली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नाही. सरकारी आकडेवारीनुसार, सोमवारी गुरुग्राममध्ये कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला, तथापि, मदनपुरी स्मशानभूमी घाटात स्मशानभूमीच्या पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतील इतके मृतदेह सापडले.

गुरुग्राममध्ये रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा आकडा समोर आल्यानंतरही आणखी 40 मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लावून ठेवले होते. सोमवारी अचानक गर्दी झाल्यामुळे येथे अंतिम संस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने कुटुंबीय आपल्या प्रियजनांचे मृतदेह त्यांच्या गाड्यांमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणत आहेत. एका व्यक्तीने असे सांगितले की त्याचे वडील कोरोना पेशंट होते. कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी त्यांना मदनपुरी येथून येथे आणले. शेवटचे संस्कार करण्यासाठी त्याला तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली.

एका व्यक्तीने सांगितले की, “स्मशानभूमीत कोणीही सामाजिक अंतराचे नियम पाळत नाही. येथे सुमारे 500 लोक उपस्थित होते. माझा धाकटा भाऊ मरण पावला . तो कोरोना पेशंट नव्हता, परंतु शेवटचा संस्कार करण्यासाठी आम्हाला पाच तास वाट पाहावी लागली. अनेक लोक स्मशानभूमीत थांबले होते”.