अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा नागपूर विद्यापीठात धुडगूस

0
499

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात  प्रचंड तोडफोड केली. या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी समोर आलेले  सुरक्षाबलाचे जवानही जखमी झाले आहेत. शिवाय महिलांनाही धक्कबुक्की करण्यात आली आहे. या प्रकराबद्द्ल  संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  ३० ते ४०  कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या केबिनमध्ये निवेदन देण्यासाठी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रोखले असता त्यांनी धुडघूस घालायला सुरुवात केली.

कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या कॅबिनच्या काचा फोडल्या. यावेळी सुरक्षा बलाचे जवान योगेश गांगुर्डे यांच्या अंगावर गेट पडल्याने ते जखमी झाले. तर महिला कार्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत असताना महिला रक्षकाच्या हाताला दुखापत झाली.