अक्षय कुमारला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार वादात; कॅनडाचा नागरिक असताना पुरस्कार दिलाच कसा?

0
348

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – अभिनेता अक्षय कुमारच्या कॅनडा नागरिकत्वाबाबतचा वाद संपत नाही तोच अक्षय आता आणखी एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय जर कॅनडाचा नागरिक आहे तर त्याला भारताचा राष्ट्रीय पुरस्कार दिलाच कसा ? असा थेट सवाल सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. त्यामुळे अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अक्षयच्या राष्ट्रीय पुरस्काराला विरोध होत असतानादेखील फिल्म एडिटर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अपूर्व असरानी आणि चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी अक्षयला पाठिंबा दिला आहे. या दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून अक्षयच्या समर्थनार्थ आपली बाजू मांडली आहे.