अंबरनाथमध्ये राज ठाकरेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला तरूणाला बेदम मारहाण

0
599

अंबरनाथ, दि. ५ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम  मारहाण  केली. अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात  हा प्रकार घडला.

संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी संदीपला  मनसेच्या कार्यालयात आणून  उठाबश्या काढायला लावल्या आणि मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

दरम्यान,  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मारहाणीचे समर्थन केले आहे. ‘टीका करावी, टीका करणे हा लोकशाहीचा हक्क आहे. पण जर कमरेखालची टीका कोणी करणार असेल, तर त्यांना असाच धडा शिकवला जाईल,  असा इशारा त्यांनी दिला.