सत्येंद्र जैन यांना दिलासा..! न्यायालयाने ६ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला

PCB Admin
0 Min Read

देश ,दि. २६ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी (२६ मे) वैद्यकीय आधारावर सत्येंद्र जैन यांना ६ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. ते मे २०२२ पासून मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Share This Article