महाराष्ट्र राज्यऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची बैठक

175

– बाबा कांबळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी -चिंचवड मध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्‍त कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांची एकमताने सर्वांनी निवड केली आहे. महासचिवपदी कासम मुलाणी, कार्याध्यक्षपदी वैजनाथ देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरीत राज्यभरातील रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड येथील वैजनाथ देशमुख परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अध्यक्षपदासह इतर पदांच्या निवडीचा ठराव करण्यात आला असल्याचे वैजनाथ देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

या वेळी नरेंद्र गायकवाड (नांदेड) गफारभाई नदाफ (कराड) आनंद तांबे ,बापू भावे (पुणे) रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला,(सांगली) कासम मुलाणी (मुंबई) आनंद चौरे,रवी तेलरंदे, (नागपुर) राहुल कांबळे ( कल्याण डोंबिवली), तानाजी मासलकर, बाळू फाळके (सोलापूर), शिवाजी गोरे, आशिष देशपांडे (ठाणे), बल्लूर स्वामी (इचलकरंजी) सानी हुमने,अब्बास भाई (चंद्रपूर) आदीसह राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी, रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालक मालकांच्या हक्‍कासाठी संपूर्ण आयुष्यभर मी लढा दिला आहे. पुढेही देत राहणार आहे. रिक्षा चालकांच्या समस्या सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार आहे. रिक्षा चालक-मालक बांधवांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाणे हे मनाला पटणारे नाही कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायासाठी लढा दिला आहे. त्यामुळे अनेकांनी मला साथ दिली आहे. स्वर्गीय शरद राव यांनीही कृती समिती स्थापन केली आहे याचे अध्यक्ष स्वर्गीय शरद राव होते त्यांच्या निधनानंतर हे अध्यक्ष पद मला मिळणार होते परंतु त्यावेळेस ते नाकारले होते, परंतु आज महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केल्यामुळे मी कृती समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, स्वर्गीय शरद राव यांच्या स्वप्नातील कृती समिती निर्माण करून त्यांचे राहिलेले गुरुवारी सर्व कार्य या समितीच्या मार्फत संपूर्ण करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. जबाबदारी वाढली असून रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.