अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड, बांधकामावर हातोडा

0
344

चिखली, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फत कुदळवाडी, चिखली रस्त्यालगतच्या गट क्र. 16, 17 व 18 मधील डी.पी.रोडच्या बाधीत क्षेत्रामध्ये येणा-या मोई फाटा गट क्र. 218 मधील सुमारे 65 हजार चौरस फुट क्षेत्रावरील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड / बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , उपअभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य व अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ , बीट निरिक्षक योगेश शेवलकर, साधना ठोंबरे, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कुदळवाडी, चिखली गट क्र. 16, 17 व 18 मधील गट क्र. 197 व 198 देहू – आंळदी रस्त्यावरील व मोई फाटा गट क्र. 218 एकूण 43 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड / बांधकामाना महापालिकेमार्फत नोटीस देण्यात आल्या होत्या.

त्यापैकी 13 व्यावसायिक पत्राशेड / बांधकामे ही संबधितांनी स्वताःहून काढून घेतली. उर्वरीत 30 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड / बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी महापालिका परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा संदेशाचे फलक लावण्यात आले आहे.