PMC बँक आणखी एका खातेदाराचा मृत्यू

0
348

मुंबई, दि.५ (पीसीबी) – पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अॅड्र्यू लोबो असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७४ वर्षीय अॅड्र्यू लोबो यांचं गुरूवारी ठाण्याजवळील काशेली येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचा नातू क्रिस याने दिली. “अॅड्र्यू लोबो यांच्या खात्यात २६ लाखांची रक्कम जमा होती. त्यावरून मिळणाऱ्या व्याजावर त्यांचे घर चालत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्यासाठी त्यांना नियमित औषधे आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे लागत होते. परंतु त्यांच्याकडे असलेला पैसा बँकेत अडकल्याने आवश्यक ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या उपचारात अडथळा निर्माण झाला,” असे क्रिस यांनी सांगितले.