भारताची शान, पी व्ही सिंधूचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतूक

0
394

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमधीलसिल्व्हर गर्लआता गोल्डन गर्ल झाली आहे. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिंधू आज पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर पंतप्रधांनानीही तीचे कौतूक केले आहे.

सलग दोन अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर अखेर सिंधूने तिचे ध्येय गाठले आणि ती जगज्जेती ठरली. ४० मिनिटांहून कमी कालावधीत सिंधूने जापानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव करून इतिहास घडवला. तिच्या या विक्रमी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक सुरु आहे.

पंतप्रधान मोदींनी ही भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे असे म्हणाले. चॅम्पियन पीव्ही सिंधुभारताची शान, भारताला सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनवणाऱ्या भेट घेतल्याने आनंद झाला सिंधूला भेटून आनंद झाला. तिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” असे ते म्हणाले सिंधुला शुभेच्छा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिच्या गळ्यात गोल्ड मेडल घातले.