पिंपळे सौदागर” करांचा एकमुखी परिवर्तनाचा नारा, नानांना आमदार करण्याचा गावकीचा निर्धार

0
236

चिंचवड, दि.८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाना काटे यांचे चिंचवड मतदारसंघात असलेले संघटन आणि पक्षाचे प्राबल्य या जोरावर ते निवडून येतील असा आत्मविश्वास पक्षाला आहे. उमेदवारी अर्ज भरल्याचा पहिल्याच दिवशी नाना काटे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत.

रहाटणी पिंपळे सौदागर येथे नाना काटे गेले १५ वर्ष नगरसेवक आहेत. आता आपल्या नानांना आमदार करण्यासाठी संपूर्ण पिंपळे सौदागरने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

काल पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत मुंजोबा महाराज मंदिर पिंपळे सौदागरमधील सर्व ग्रामस्थ, भावकी, नातेवाईक, हितचिंतक, सहकारी, कुटुंबातील सदस्य यांनी स्वयं स्फूर्तीने बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी एकमताने नाना काटे आप आपसातील सर्व नाराजी विसरून एकदिलाने नाना काटे यांच्या मागे उभा राहण्याचा निर्धार केला. संपूर्ण गावच एकत्रीत झाल्याने नाना काटेंचे पाहिले पाऊल यशस्वी झाले आहे असे दिसते.

नाना काटे यांच्या रूपात आपल्या हक्काचा माणूस आमदार होणार आहे, या निमीत्ताने पिंपळे सौदागर चे नाव राज्याच्या विधिमंडळात पोहचण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असा सूर या बैठकीत उमटलेला दिसून आला. आजवर आपल्या अडीअडचणीत निस्वार्थ वृत्तीने आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्यास आमदार करण्यास सर्वांनी पूर्ण ताकदीने निवडणुकीत काम करणार असल्याचे जाहीर केले.

पिंपळे सौदागरवासियांचा पूर्ण चिंचवड मतदारसंघात प्रभाव आहे. नातेवाईक मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी मिळालेले एकतर्फी समर्थन हे नाना काटेंना विजयाच्या नजिक घेवुन जाणारे आहे.