Mrs. India One in a Million Season 2 स्पर्धेत पुण्याच्या सुप्रिया शिंदे ठरल्या Mrs. Maharashtra

0
443

-दिल्लीतल्या ताज विवांता हॉटेलमध्ये टिस्का पॅजंट्सने आयोजित केली स्पर्धा
-मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर आणि मान्यवर होते स्पर्धेचे परीक्षक

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – दिल्लीत नुकत्याच झालेल्या Mrs. India One in a Million स्पर्धेच्या सिझन 2 मध्ये पुण्यातील आयटी प्रोफेशनल सुप्रिया शिंदे यांनी Mrs. Maharashtra हा किताब पटकावला. या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये 100 जणी अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यापैकी विविध श्रेणींत महिलांची किताबासाठी निवड करण्यात आली. सुप्रिया यांच्या श्रेणीत 33 जणी तीन राउंड पार करून अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या या सर्वांना मागे टाकत सुप्रिया यांनी हा किताब पटकावला.

ग्रँड फिनालेपर्यंत असलेल्या तीन राउंड्समध्ये सहभागी झालेल्या महिलांचं ग्रुमिंग, मेंटॉरिंग करण्यात आलं. परफॉरमन्स सेशन्ससह ग्रुमिंग, मेंटॉरिंगच्या टास्कमध्ये निगेटिव्ह मार्किंगही होतं. या स्पर्धेला माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री आदिती गोवित्रीकर सेलिब्रिटी ज्युरी म्हणून उपस्थित होत्या.

सुप्रिया यांचा जन्म नाशिकचा असून त्या तिथंच लहानाच्या मोठ्या झाल्या. वडिलांना व्यवसायात भलं मोठं नुकसान झाल्यानंतर त्यांच्या एकत्रित कुटुंबाच्या सहाय्यानं सुप्रिया यांनी शिक्षण पूर्ण केलं. पद्मश्री शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारा या लोककलांच्या कार्यक्रमात सुप्रिया शिंदेंनी काम केलं आहे. त्यांना लहानपणापासूनच नृत्य, गायन आणि अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी लहानपणी शाळेत, तरुणपणी कॉलेज आणि सोसायटीच्या कार्यक्रमांत सहभाग घेतला. पुण्यातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुप्रिया यांनी त्यांच्या कुटुंबातील मध्यमवर्गीय संस्कारांना आव्हान देण्यासाठी नाशिक कायमचं सोडलं आणि त्या पुण्यात नोकरी करू लागल्या. आयटी क्षेत्रात 12 वर्षं नोकरी करतानाच लग्न आणि बाळंतपणाचे आयुष्यातील मुख्य टप्पे त्यांनी पूर्ण केले आणि नंतर आपल्या पॅशनसाठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.

Mrs. Maharashtra किताब पटकवल्यानंतर सुप्रिया म्हणाल्या, ‘मला माझा मनातला आवाज कायमच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काही करून दाखवण्यासाठी प्रेरित करायचा; पण आयटी प्रोफेशनल असल्याने मी कायमच कामात गुंतलेली असायची त्यामुळे ब्युटी इंडस्ट्रीशी माझा संबंधच राहिला नव्हता. बाळंतपणानंतर माझं वजन खूपच वाढलं होतं, नोकरी सांभाळून 4 वर्षांच्या मुलाकडे लक्ष द्यायचं होतं त्यामुळे मी सुरुवातीला एंटरटेनमेंट उद्योगात यायला कचरत होते. माझी इच्छा मी माझ्या पतीकडे व्यक्त केल्यावर त्यांनी सौंदर्य स्पर्धांत सहभागी होण्यासाठी मला खूपच प्रोत्साहन दिलं आणि माझ्या या संपूर्ण प्रवासात मोलाची साथ दिली, पाठिंबा दिला. तेच माझा सर्वांत मोठा आधार आहेत.’