अदाणी ग्रुपच्या शेअर घसरणीत LIC ला फटका

0
317

नवी दिल्ली, दि .२८ (पीसीबी) : अदाणी समूहाच्या समभागांच्या घसरणीने केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये खोलवर परिणाम केला. देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळ देखील अशा प्रभावित गुंतवणूकदारांपैकी एक आहे. 27 जानेवारी 2023 रोजी LIC ची अदाणी समूहाच्या शेअर्समधील एकत्रित गुंतवणूक 62,621 कोटी रुपयांवर घसरली. 24 जानेवारी 2023 रोजी तो 81,268 कोटी रुपये होता. म्हणजेच LIC ला दोन ट्रेडिंग सत्रात 18,647 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

भागभांडवल किती आहे?

Ace Equity कडे उपलब्ध डेटा दर्शवितो की 31 डिसेंबर 2022 पर्यंत, LIC कडे अदाणीएंटरप्रायझेस, अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणीपोर्ट्स, अदाणी टोटल गॅस, अदाणी ट्रान्समिशन आणि अलीकडेच विकत घेतलेल्या सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स आणि ACC मध्ये प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक भाग आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये या कंपन्यांचे शेअर्स 19 ते 27 टक्क्यांच्या दरम्यान घसरले आहेत.
अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा रिपोर्ट

अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने कंपन्यांना ओव्हरव्हॅल्युएशन केल्याचा दावा केल्यानंतर, अदाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की अदाणीसमूहाच्या 7 मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, अदानीचे ग्रुप सीएफओ, जुगशिंदर सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की हा अहवाल निराधार आहे आणि समूहाची बदनामी करण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने प्रेरित आहे. या अहवालात अनेक चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांना कोणताही आधार नाही, असं ते म्हणाले.

किती घट झाली?

अदाणीटोटल गॅसमधील एलआयसीच्या एकूण गुंतवणुकीत 24 जानेवारीपासून 6237 कोटी रुपयांची घट झाली आहे. यानंतर अदाणीएंटरप्रायझेसमध्ये 3,279 कोटी रुपये, अदाणीपोर्ट्समध्ये 3,205 कोटी रुपये, अदाणीट्रान्समिशनमध्ये 3,036 कोटी रुपये, अंबुजा सिमेंट्समध्ये 1,474 कोटी रुपये, अदाणीग्रीन एनर्जीमध्ये 871 कोटी रुपये आणि एलआयसीच्या गुंतवणुकीत एकूण 544 कोटी रुपयांची घट झाली आहे.
अदाणी ग्रुपचे 4 लाख कोटी बुडाले

एकूण, 27 जानेवारी रोजी 10 सूचीबद्ध अदाणी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. 24 जानेवारी 2023 रोजी अदाणी समूहाचे मार्केट कॅप 19 लाख कोटी रुपये होते, जे 27 जानेवारीला 15 लाख कोटी रुपये झाले. हिंडेनबर्गच्या अहवालाचा बाजाराच्या सेंटीमेंटवर परिणाम झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ झाली. हिंडेनबर्ग संशोधनाच्या ताज्या अहवालात अदाणी समूहाला 88 प्रश्न विचारण्यात आले आहेत. या अहवालामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्या.