खेलो इंडिया, फिट राहो इंडिया – प्रकाश जावडेकर

37

खडकी शिक्षण संस्थेत व्यायाम शाळेचे उद्घाटन

पुणे, ता. २१ (पीसीबी) – विद्यार्थी जीवनाचा काळ हा सतत काही शिकण्याचा, नवनवे गुण आत्मसात करण्याचा असतो. लहानपणीच ध्येय निश्चित करावे. अभ्यासाबरोबर खेळावरही भर द्यावा. खेळामुळे शरीर बळकट होते आणि मनही एकाग्र होते. पुढची पिढी फिट राहावी म्हणून 10 शाळांमध्ये ओपन जिम देण्यात आले आहे. असे प्रतिपादन खासदार मान. प्रकाशजी जावडेकर यांनी केले.

खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात खासदार माननीय प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल यांनी भूषविले. यावेळी डॉ. ए.पी. कुलकर्णी, नागरी संरक्षण दलाचे सहायक उपनियंत्रक आनंद शिंदे, खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहनलाल जैन, राजेंद्र भुतडा, रमेश अवस्थे, नरेश गुप्ता, सुधीर फेंगसे, कमलेश पंगुडवाले यांच्यासह सर्व संचालक, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शूटिंग बॉल व हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या व मिनी ऑलंपिकमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. तसेच नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात श्री. गोयल यांनी नवीन शैक्षणिक धोरण व पुण्याच्या विकासात श्री. जावडेकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. एकनिष्ठा आणि प्रयत्न, सातत्य असेल तर यश मिळते, असे सांगून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव आनंद छाजेड सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
यावेळी खडकी शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.