ठरलं… चिंचवडला महाआघाडीचे उमेदवार राहुल कलाटे

0
665

पुणे, दि. ४ (पीसीबी) : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे याना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा मतदारसंघ हा राष्ट्रावादी काँग्रेसला सुटला आहे. तर चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना मौदानात उतरवण्यात आले आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल कलाटे उमेदवारी देण्यामागे नेमके कारण –

राहुल कलाटे यांनी यापूर्वी दोन वेळा चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली. २०१४ मध्ये त्यांना ६७ हजार मते मिळाली होती, तर २०१९ मध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांना तब्बल १ लाख १२ हजार मते मिळाल्याने आता यावेळी पुन्हा भाजप विरोधात सर्वपक्षिय उमेदवार म्हणून कलाटे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कलाटे यांचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार श्रीरंग बारणे यांचे ते कट्टर विरोधक समजले जातात. एकाच वेळी भाजप आणि शिंदे गटाला शह द्यायचा असेल तर कलाटे यांचे नाव योग्य राहिल या निष्कर्षावर महाआघाडीचे नेते आले आहेत. नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे आदी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेर कलाटे यांच्या नावावर एकमत झाले, असे समजले. राष्ट्रवादीमध्ये कोणालाही उमेदवारी दिली तरी बंडखोरीची शक्यता अधिक होती तसेच जगताप कुटुंबाला शह देतील असे ताकदवान नेतृत्व नसल्याचे सर्वेक्षणात आढळले. कलाटे यांच्या नावाला हाऊसिंग सोसायट्यांचे सभासद तसेच आयटी क्षेत्रातूनही मोठे पाठबळ असल्याचे लक्षात आले आणि स्वतः अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन नाव निश्चित केले असे समजले.

दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच आता फडणवीस यांच्या मनातील उमेदवार नेमका कोण? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.