बदलत्या जीवनशैलीमुळं कर्करोगाच्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक असेल

42

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळं भारताला कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या ‘त्सुनामी’चा सामना करावा लागणार आहे, असा इशारा अमेरिकेतील एका प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञानं दिला आहे.

या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय तंत्राचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असं अमेरिकेच्या ओहायो येथील क्लीव्हलँड क्लिनिकमधील डॉ. जेम अब्राहम. जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळं कर्करोगाच्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या अंदाजानुसार, 2040 मध्ये जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 28.4 दशलक्ष असेल, जी 2020 च्या तुलनेत 47 टक्के जास्त असणार आहे. जागतिकीकरण आणि वाढत्या अर्थव्यवस्थेशी संबंधित जोखीम घटकांमध्ये वाढ झाल्यामुळं ही संख्या वाढू शकते. 2020 मध्ये जगभरात कर्करोगाचे अंदाजे 1.93 कोटी नवीन रुग्ण आढळले आणि सुमारे एक कोटी लोकांचा कर्करोगामुळं मृत्यू झाला. ‘मनोरमा इयर बुक 2023’ मधील एका लेखात कर्करोगतज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे.