चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

0
356

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दणका देत पी. चिदंबरम यांना सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यानुसार आज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने पुन्हा दिवसांची म्हणजेच ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. ‘आयएनएक्स मीडियाकंपनीत सात वर्षांपूर्वी ३०५ कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. पी. चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.