बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी झाला रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट !

0
192

मुंबई, दि.२७ (पिसीबी) : प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अन्नू कपूर यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अन्नू कपूर यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ते रुग्णालयातील कार्डियोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. अन्नू कपूर यांच्या प्रकृतीत हळू-हळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अन्नू कपूर अद्यापही रुग्णालयात आहेत.

अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितलं, ‘प्रसिद्ध अभिनेते आणि गायक अन्नू कपूर यांना गुरुवारी सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.’ असं सांगितलं. तर दुसरीकडे सर गंगाराम रुग्णालयाचे डॉ. अजय स्वरूप यांनी देखील अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली.

डॉ. अजय स्वरूप म्हणाले, ‘अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्नू कपूर यांच्यावर डॉ. सुशांत वट्टल यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.’ असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहते आणि बॉलिवूडकर चिंता व्यक्त करत आहेत.

अन्नू कपूर 66 वर्षांचे आहेत. अन्नू कपूर हे रेडियो जॉकी, अभिनेते, गायक आणि टीव्ही होस्ट देखील आहेत. अन्नू कपूर यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय टीव्ही शोमध्ये देखील अन्नू कपूर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. अन्नू कपूर अभिनय विश्वात गेल्या ४ दशकांपासून काम करत आहेत.

अन्नू कपूर यांचे पुरस्कार

अन्नू कपूर यांनी त्यांच्या 4 दशकांच्या कारकिर्दीत 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 1 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अन्नू कपूर यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि शशि कपूर ‘काला पत्थर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अन्नू कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अन्नू कपूर यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर’ अशा अनेक सिनेमांतून कलाविश्वात पदार्पण केलं. पण अन्नू कपूर यांना 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’ , ‘डर’ आणि ‘जॉली एलएलबी 2’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंज केलं.