महात्मा फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

0
403

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव  पाटील यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “दान ही आपली भारतीय संस्कृती आहे. अन्नदान, वस्त्रदान सुवर्ण सान, भूमीदान या पर्णपारिक दान पद्धतीबरोबरच  आता “रक्तदान, नेत्रदान, अवयवदान , देहदान या पद्धती समाजात रूढ होत आहेत. अपघात, युद्ध, विविध आजार यामध्ये व्यक्तिला रक्ताची गरज भासते. आपल्या रक्तदानामुळे व्यक्तिला नवजीवन मिळू शकते.”

यावेळी विद्यार्थी प्राध्यापक यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ४० बाटल्या संकलित झाल्या. यावेळी महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, कला विभागाच्या उपप्राचार्या मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या प्रा. संजीवनी पाटील कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संदीप नन्नावरे, प्रा. इसाक शेख, डॉ. भारती यादव उपस्थित होते.