चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी ३७ लाख रुपये मंजूर

0
499

नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश….

चिंचवड,दि.०३(पीसीबी) – आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तथा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा महाराष्ट्रातील सर्वात जुना अर्धपुतळा चिंचवड स्टेशन १६ मे १९८५ रोजी स्थापित करण्यात आला , त्यांच्या स्मृती सदैव मनात राहाव्या ,या उद्देशाने हे स्मृतिस्थळ महापालिकेने उभे केले आहे, त्या पुतळ्यांना मेघडंबरी तसेच सुशोभीकरण व्हावे म्हणून गेल्या वर्षापासून स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे पाठपुरावा करत होत्या, त्याला यश आले असून या दोन्ही महान क्रांतिवीरांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी मनपाने ३७ लाख रुपये मंजूर केले असून त्याच्या कामाची निविदा ही मंजूर झाली आहे, लवकरच काम चालू होईल अशी माहिती भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली.

नगरसेविका अनुराधा गोरखे, अ प्रभाग अध्यक्ष असताना या कामाचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता व याचे सुशोभिकरण व्हावे म्हणून पाठपुरावा करून उपरोक्त निधी मंजूर करून आणला आहे. अशी माहिती नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली आहे.