कलम ३७० रद्द करणे हे राष्ट्रहिताचे – उपराष्ट्रपती

0
410

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कलम ३७० ‘ रद्द करणे हा राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विषय आहे असे विधान केले आहे. तसेच ‘कलम ३७०’ रद्द करणे काळाची गरज आहे. आपण सर्वांनी राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. कलम ३७० हा राजकीय मुद्दा नसून तो राष्ट्रहिताचा मुद्दा आहे कारण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे. तेथे जे काही प्रश्न असतील ते सोडवून काश्मीरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे विधान केले आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवले नसते असे त्यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे अशी टीका भाजपवर आणि माध्यमांवर केली आहे.