इंदोरीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

0
424

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – इंदोरी-चाकण रस्त्याजवळ अंदाजे २० ते २५ वयोगटातील अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास इंदोरी-चाकण रस्त्याजवळ एक मृतदेह आढळून आल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात तरुणाचा खून झाल्याचे समजते. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.