पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजाराम रामराव पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
पाटील हे राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर.आर पाटील यांचे बंधू आहेत.त्यांची आज पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. सोमवारी (दि.१७) त्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.