केंद्रात स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची वचनपूर्ती

0
736

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवले जाईल, असे वचन दिले होते. या पार्श्वभूमावर त्यांनी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करून आपली वचनपूर्ती केल्याचे दिसत आहे. नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या या स्वतंत्र मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी जोधपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या गजेंद्रसिंह  शेखावत यांच्यावर सोपवली आहे. गजेंद्रसिंह  यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव केला आहे. या आधीच्या मोदी सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे जबाबदारी असलेल्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन मंत्रालयाची पुनर्रचना करून या नव्या जलशक्ता मंत्रालयाची निर्मिती केली गेली आहे. शिवाय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा देखील यात समावेश केला गेला आहे.