केंद्रात स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची वचनपूर्ती

0
756

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवले जाईल, असे वचन दिले होते. या पार्श्वभूमावर त्यांनी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करून आपली वचनपूर्ती केल्याचे दिसत आहे.

नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या या स्वतंत्र मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी जोधपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या गजेंद्रसिंह  शेखावत यांच्यावर सोपवली आहे. गजेंद्रसिंह  यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव केला आहे. या आधीच्या मोदी सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे जबाबदारी असलेल्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन मंत्रालयाची पुनर्रचना करून या नव्या जलशक्ता मंत्रालयाची निर्मिती केली गेली आहे. शिवाय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा देखील यात समावेश केला गेला आहे.

लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान तामिळनाडूत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले होते की, पुन्हा सत्तेत येताच त्यांच्या सरकारद्वारे नक्कीच नव्या जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली जाईल. २३ मे रोजी जेव्हा मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या आश्वासनाची पुर्तता केली. हे मंत्रालय पाण्याशी संबंधित विविध पैलूंचे पालन करेल, “असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच, एनडीए सरकारने जलस्रोतांवर लक्ष केंद्रित केले आहे. शेतक-यांसाठी स्वच्छ पाणी आणि उच्च श्रेणीतील सिंचनाच्या सुविधांची सुनिश्चितता करण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय काम करेल असेही मोदींनी म्हणाले. शिवाय भाजपाच्या जाहीरनाम्यात देखील देशभरातील पाणीप्रश्न नष्ट करण्यासाठी स्वतंत्र जल मंत्रालयाची निर्मिती केली जाईल असे म्हटले होते.

प्रत्येक वर्षी एप्रिल ते जुलैमध्ये देशभरातील किमान आठ राज्यांमध्ये जलसंकट निर्माण होते. केंद्र सरकारने नुकताच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि तमिळनाडु या राज्यांना दुष्काळसंबंधी सल्ला दिला आहे. येत्या काही आठवड्यात धरणातील पाणीसाठा मोठ्याप्रमाणात खालवणार असल्याने धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. देशभरातील ग्रामिण भाग हा शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पावसाच्या पाण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे युद्धपातळीवर जल व्यवस्थापनसाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.