मुंबई, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची लगबग राजकीय पक्षांमध्ये सुरु झाली आहे. शिवसेनेने राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आपल्या २३ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
२) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
३) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर
४) ठाणे – राजन विचारे
५) कल्याण – श्रीकांत शिंदे
६) पालघर – श्रीनिवास वनगा
७) रायगड – अनंत गिते
८) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
९) कोल्हापूर – संजय मंडलिक
१०) हातकणंगले – धैर्यशिल माने
११) नाशिक – हेमंत गोडसे
१२) शिर्डी – सदाशिव लोखंडे
१३) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
१४) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
१५) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
१६) बुलढाणा – प्रतापराव जाधव
१७) रामटेक – कृपाल तुमाणे
१८) अमरावती- आनंदराव अडसूळ
१९) परभणी- संजय जाधव
या उमेदवारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही
२०) मावळ – श्रीरंग बारणे
२१) उस्मानाबाद – रवी गायकवाड
या उमेदवारांवर अजून निर्णय नाही
२२) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस
२३) हिंगोली – हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस