पिंपळे सौदागर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने महिलेला जबर मारहाण करुन लुटले

0
563

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – महिलेने तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून त्या तरुणाने महिलेला सिमेंटच्या ब्लॉगने मारहाण करुन तिच्या जवळील रोख, मोबाईल आणि गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसुत्र असा एकूण ४१ हजारांचा ऐवज जबरदस्ती चोरुन पसार झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटी येथील गेट क्र.१ च्या आतमध्ये घडली.

याप्रकरणी पिडित ४० वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, प्रदिप सुभाष जाधव (वय २५, रा. शुभी मोटर्सच्या, वडगाव फाटा, पुणे) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१८ मध्ये पिडित महिलेने आरोपी प्रदिप जाधव विरोधात वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरुन प्रदिप याने  पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटी येथील गेट क्र.१ येथे महिलेला आडवून, “तु माझ्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ना आता मी तुला सोडत नाही”, असे म्हणून सिमेंटचा ब्लॅक महिलेच्या पायावर मारुन जखमी केले. तसेच पोटात लाथा मारुन महिलेच्या गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसुत्र, रोख रक्क आणि मोबाईल असा एकुण ४१ हजारांचा ऐवज जबरदस्ती चोरुन पसार झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रदिप याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.