पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हात नाही; पाक परराष्ट्रमंत्र्यांचे नापाक विधान

0
686

इस्लामाबाद, दि. २ (पीसीबी) – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असेल, याची मला खात्री नाही, असे सांगून जैशच्या अनेक मोठ्या कमांडर्सनी याबाबत हात वर केले आहेत. तसेच जैशने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही, असे  पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी  म्हटले  आहे. 

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहे. जैश…नेदेखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणतात की, मला खात्री नाही की, या हल्ल्यामागे जैशचा हात असेल.

बीबीसी या वृत्तवाहिनीला मेहमूद कुरैशी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत कुरैशी यांनी कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुरैशी यांना पत्रकारांनी सांगितले की, “पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे.” तरीदेखील कुरैशी यांनी हे मान्य केले नाही.