तळवडेत पायी मोबाईलवर बोलत चाललेल्या इसमाचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवला

0
789

तळवडे, दि. १६ (पीसीबी) – पायी मोबाईलवर बोलत चाललेल्या एका इसमाच्या हातातला मोबाई मागून दुचाकीवरुन आलेल्या तिघाजणांनी जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री साडेदहाच्या सुमारास तळवडे येथील जोतीबानगरमधील जोतीबा मंदीराजवळ घडली.

याप्रकरणी सोमनाथ शंकर (वय २५, रा. शेड क.३, स्वामी समर्थ बंगल्याजवळ, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अज्ञात तिघा इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तळवडे येथील जोतीबा मंदीराजवळील रस्त्यावरुन पायी फोनवर बोलत चालले होते. यावेळी मागून एका दुचाकीवरुन आलेल्या तिघाजणांपैकी एकाने त्यांच्या हातातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात तिन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.