वामनदादांची शाहिरी माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते! – ॲड. सतिश गोरडेबहुजन फेस्टिव्हल संपन्न

PCB Admin
2 Min Read


पिंपरी, दि. १ ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची शाहिरी माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते!’ असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ आणि न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त बहुजन सैनिक महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित बहुजन फेस्टिव्हलचे उद्घाटन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ॲड. सतिश पाटोळे, बसपा कार्यकर्ते धम्मदीप लिगाडे, छावा संघटना प्रदेशाध्यक्ष अश्विनी पाटील तसेच संयोजक यशवंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुजन सैनिकचे यशवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक म्हणजे केवळ एक शाहीर नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी विद्यापीठ होते. त्यांच्या हातात डफ होता, त्यांच्या कंठात गीत होते; पण त्यांच्या गीतांचा खरा उद्देश केवळ मनोरंजन नव्हता. समाजातील अन्याय, विषमता, अज्ञान आणि शोषणाविरुद्ध जनजागृती करणे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या शाहिरीचे खरे सामर्थ्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला, संघटित होण्याची प्रेरणा दिली आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली. बाबासाहेबांचे हे विचार लोकांच्या मनामनांत रुजवण्याचे महान कार्य वामनदादांसारख्या शाहिरांनी केले. बाबासाहेबांनी विचार दिले, संविधानाने अधिकार दिले आणि वामनदादांच्या शाहिरीने त्या विचारांना जनतेच्या मनात पोहोचवण्याचे काम केले!’

Contents
पिंपरी, दि. १ ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची शाहिरी माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते!’ असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ आणि न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त बहुजन सैनिक महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित बहुजन फेस्टिव्हलचे उद्घाटन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ॲड. सतिश पाटोळे, बसपा कार्यकर्ते धम्मदीप लिगाडे, छावा संघटना प्रदेशाध्यक्ष अश्विनी पाटील तसेच संयोजक यशवंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुजन सैनिकचे यशवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

नागनाथ कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून,
‘वामनदादांची शाहिरी आपल्याला जागृत करते. बाबासाहेबांचे विचार आपल्याला दिशा देतात. आणि भारतीय संविधान आपल्याला न्यायपूर्ण समाजनिर्मितीचा मार्ग दाखवते. म्हणूनच आजच्या या बहुजन फेस्टिव्हलने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, संविधान जनजागृती, सामाजिक समता, शिक्षण, बंधुता आणि बहुजनांच्या हक्कांसाठी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे!’ असे आवाहन केले. यावेळी उपस्थित शाहीर, कवी आणि संगीतसाथ देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. अनिता बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Share This Article