भाजपच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने दिलेले योगदान, धडाडीचे व अभ्यासू नेतृत्व तसेच पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक धनराज बिरदा यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले धनराज बिरदा हे उत्तम संघटक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. शहरासह राज्य व देशातील विविध राजकीय नेतेमंडळींशी त्यांचे घनिष्ठ संबंध असून, पक्षसंघटनेत युवकांना जोडण्याचे आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
त्यांच्या या संघटनात्मक योगदानाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रदेशस्तरीय महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

