पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोरवाडी आयटीआय मधील प्रशिक्षणार्ध्याची सौदी अरेबिया येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड

bpcauthor
2 Min Read

सन 2021- 23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबिया मधील दमाम येथे जूनियर डिझायनर म्हणून निवड झाली.
हा प्रशिक्षणार्थी आयटीआय मध्ये प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम आला होता या निकषावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्राप्त झाली. नंतर याच कंपनीमध्ये ट्रेनि म्हणून निवड झाली. उत्कृष्ट कामकाज, तांत्रिक कौशल्य व प्रामाणिकता याचे मूल्यमापन करून इनप्रो कंपनीने सौदी अरेबिया येथील मुख्य कंपनीमध्ये असिफ ची ज्युनियर डिझायनर म्हणून निवड केली आहे व याबाबतचा सर्व आवश्यक खर्च कंपनी करणार आहे.

सदर प्रशिक्षणार्थ्याचे पालक हयात नसताना व हलाखीच्या परिस्थितीत त्याने उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याची प्रेरणा घेऊन त्याच्या बहिणीने देखील मोरवाडी आयटीआय मध्ये चालू शैक्षणिक क्षेत्रात ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडला प्रवेश घेतला आहे तसेच असिफचा आतापर्यंतचा संघर्ष व प्रवास इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणादायी आहे.

मनपा आयटीआय मारवाडी अशा विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देते व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे उज्वल करिअर घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. कुलदीप जंगम अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली लवकरच विभाग अंतर्गत परदेशी शिक्षण व रोजगार हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

असिफ ने मिळवलेल्या यशाबद्दल व त्याच्या पुढील वाटचालीस प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक ओव्हाळ आर. एस., निदेशक काळोखे व्ही. व्ही. सर्व गटनिदेशक व निदेशक यांनी हार्दिक अभिनंदन व खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.

Share This Article