भाजप पिंपरी-चिंचवड ‘मुख्य प्रवक्तेपदी’ अभ्यासू व धडाडीचे नेतृत्व श्री. राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती!

bpcauthor
2 Min Read

​शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याचा केला संकल्प

भारतीय जनता पार्टी पिंपरी- चिंचवड शहराच्या संघटन बळकटीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर ठामपणे मांडण्यासाठी मा.नगरसेवक श्री. राज अनंत दुर्गे यांची भाजप पिंपरी-चिंचवड शहर ‘मुख्य प्रवक्तेपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे.

​भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. नगरसेवक श्री.राज दुर्गे यांना नियुक्तीपत्र सोपवून या महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीच्या पदावर त्यांची वर्णी लावण्यात आली.

​पक्षाचा विचार आणि महापालिकेचा विकास जनतेपर्यंत पोहोचवा : श्री शत्रुघ्न (बापू) काटे
​या प्रसंगी श्री. राज दुर्गे यांचे अभिनंदन करताना भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले,”श्री. राज दुर्गे हे अभ्यासू, वक्ते आणि पक्षाची तत्त्वप्रणाली तळागाळापर्यंत पोहोचवणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी मांडणी करणे, महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांचा आलेख मांडणे आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देणे यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​पक्षाची ध्येय-धोरणे ठामपणे मांडणार : श्री राज दुर्गे
​आपल्या नियुक्तीबद्दल विचार व्यक्त करताना श्री.राज दुर्गे म्हणाले, “माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे, विचारसरणी आणि शहरात झालेला विकास विविध प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन.”

Share This Article