स्वीकृतच्या विषयावर राष्ट्रवादी चे नगरसेवक आक्रमक सर्वसाधारण सभा तहकूब,१५ मे ला स्वीकृत ची नावे जाहीर करण्याचे रवी लांडगे यांचे आश्वासन

0
3

दि,०५(पीसीबी)- राज्यातील बहुःतांशी महापालिकांच्या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेत त्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका सभेत आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांची नावे आजच जाहीर करा, भाजपच्या स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित होत नसतील तर तो निर्णय नंतर जाहीर करा, अशी आग्रही भूमिका माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, वैशाली घोडेकर यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली.

दरम्यान, महापौर लांडगे यांनी भाजपमध्ये सात पैकी केवळ एका नावावर निर्णय होत नसल्याने नावे रखडली आहेत.१५ मे रोजी होणाऱ्या सभेत सर्व नावे जाहीर करणार असल्याचे सांगत आक्रमक नगरसवेकांना समजावण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढत गेला आणि अखेर सत्ताधारी भाजपच्या दादागिरी विरोधात राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने गदारोळ आणखी वाढला. त्यावर महापौर रवि लांडगे यांना सभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावी लागली.

नामनिर्देशीत सदस्यांची नियुक्ती कऱण्याचा विषय विनोद नढे यांनी मांडला. त्यावर बोलताना जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, सत्ताधारी पक्षाला विनंती करतो की, स्वीकृत सदस्यांचा विषय आता खूप मोठा झालाय. मला वाटत नाही की, कोणाला घाबरायचे काम आहे. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घ्या. कायम भाजपवर टीका करणाऱ्या जेष्ठ नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्यांना बिनविरोध निवडूण दिले. मुळात आमच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या संघाची निवड आम्ही करणार आहोत, तुम्हीच ते ठरवणार असाल तर आमचा उपयोग काय. तुम्हाला हा विषय करायचा नसेल तर फेटाळा. जी तीन नावे दिली आहेत ती आमच्या पक्षात एकमताने निवड झालेली आहेत. आमची तीन नावे जाहीर करा, ती वैध झालेली आहेत. प्रशासनाने हा विषय आणला आहे. आमचा विषय मंजूर करावा, तुमची नावे तुम्ही नंतर घेतली तरी चालतील.
सत्ताधारी नेते प्रशांत शितोळे यांनी भोईर यांना उत्तर देताना, आम्हाला तुमच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) नावांबद्दल कुठलाही आक्षेप नाही. महापौर हा विषय तहकूब करावा, अशी सुचना शितोळे यांनी केली.