बीड जिल्ह्यात मुलिंचा जन्मदर पुन्हा घसरला, १००० मुलांमागे ८६२ मुली

0
2

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा मुलिंचा जन्मदर घसरला आहे. १००० मुलांमागे गेल्या वर्षी ९३७ मुलींचा जन्मदर होता मात्र यावर्षी मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला असून एक हजार मुलांमागे ८६२ मुलींचा जन्म होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून आम्ही सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणार आहोत विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल किंवा दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू तसेच पर जिल्ह्यात जाऊन जर कोणी सोनोग्राफी करत असेल तर आम्ही ट्रॅकिंग करू आणि जर कोणी दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू असे सांगण्यात आले आहे.