शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ – नातेश राणेचित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

PCB Admin
2 Min Read

नाशिक, दि. १७ – हिरवे साप जास्त वळवळ करायला लागलेत. त्यांना वेळीच ठेचले पाहिजे, नाहीतर घरापर्यंत येतील असं म्हणतं नितेश राणे यांनी नाशिकच्या लव्ह जिहाद प्रकरणातील वादाला तोंड फोडलं आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला. चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

परत टोप्याचा फोटो इथं दिसला तर तांडव करेल. तुमचा बाप असेल तर पाकिस्तानमध्ये जा. हिंदुस्थानमध्ये घाण साफ करायची आम्ही पीएचडी केली आहे. तेव्हा काठी घेऊन काही उभे होते पण काही केलं नाही. मंत्रालयात जातांना सगळे व्हिडीओ घेऊज जातोय. पीआयला सांगतो वातावरण खराब करू नका. देवाभाऊच सरकार आहे त्यांचे नाव खराब करू नका. पहिले हिंदूच हित बघितले जाते, मग नंतर हिरव्या सापाचे बघू, नाशिकचे उदाहरण समोर आहे.

नितेश राणे यांनी सांगितले की, मीडियाचे लोक दांडे घेऊन आले आहेत. तसेच मोठ्या कंपनीत आम्ही त्यांना नोकऱ्या पोट भरण्यासाठी देतो. नोकरी मिळाल्यावर पोट भरत नाहीतर धर्म वाढवत आहे. त्यांची मानसिकता जिहादी आहेत निदा खान एचआर लपून बसली आहे. कुठल्या बिळात जाऊन बसली आहे? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. कुठेही गेली तरी बरोबर बाहेर काढतो. दिल्ली बॉम्ब स्फोटातील बाई तिच्याशी संबंधित आहे. हिंदू बहिणींना धर्म परिवर्तन, बीफ खायला देत होती.

नितेश राणे यांनी असा दावा केला की, शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या मते, या चित्रपटांमधील विशिष्ट दृश्यांचा आणि सादरीकरणाचा परिणाम तरुण पिढीवर होऊन अशा घटना घडत आहेत.

त्यांनी जाहीर सभेत लोकांना शाहरुख खान आणि आमिर खान यांचे चित्रपट पाहू नका, असे थेट आवाहन केले. प्रेक्षकांनी या ‘खान’ कलाकारांच्या चित्रपटांऐवजी हिंदू कलाकारांच्या चित्रपटांना (उदा. ‘धुरंधर’, ‘छावा’) पसंती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असा आरोप केला की, बॉलीवूडमधील काही मंडळी नोकरी आणि ग्लॅमरचा वापर करून हिंदू महिलांचे धर्मांतर करण्यासाठी किंवा त्यांना लक्ष्य करण्यासाठी करत आहेत.

Share This Article