प्राधिकरणातील सलून व्यावसायात पाणी चोरी उघड केल्याने लाख रुपये दंड – जेष्ठ नागरिक दत्तात्रय धामणस्कर यांच्यासह जेष्ठांची धाडशी काम

0
5

दि. १३ – निगडी प्राधिकरणातील काही सलून व्यवसायातून राजरोस पाणी चोरी सुरू असल्याचे अनेकदा महपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले पण, कारवाई होत नसल्याचे लेखी गाऱ्हाणे जेष्ठ नागरिकांनी महापौर रवि लांडगे यांना प्रत्यक्ष भेटून केले आहे.धूळ मुक्त पिंपरी चिंचवड शहर मोहिमेत सहभागी नागरिकांसह महापौर रवि लांडगे यांची शिष्ठमंडळाने भेट घेतली आणि पत्र दिले. शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत असताना अशा पाणी चोरी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. जेष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय धामणस्कर, सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष नामदेव जाधव यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला.

लेखी पत्रात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड शहर आर्थिक विवंचनेत आहे, अशा वेळेस सामान्य नागरिकांनी मिळून हा विषय मांडला आहे. ज्येष्ठ नागरिक श्री दत्ता धामणस्कर यांनी प्राधिकरणामध्ये सलून व्यवसायात पाण्याचा कमर्शियल वापर होत असल्याचे वारंवार नमूद केले होते. पाणी चोरी होत असल्याचे अ प्रभाग अधिकारी निवेदिता घागरे यांना सांगितले होते त्यांनी त्यावर दुर्लक्ष केले. सतर्क नागरिकाने माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागवल्यावर कॉर्पोरेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री स्वामी यांनी अत्यंत परिश्रम करून मागील तीन वर्षाचा अभ्यास करून ही पाणी चोरी होत आहे हे मान्य केले. महापालिकेला तसा अहवाल पाठवला आणि त्यावर एक लाख ३०० रुपये दंड आकारणी केली. सलून मालकाला झालेला हा दंड महापालिकेच्या उत्पन्नात भार टाकणारा ठरला आहे.
धक्कादायक प्रकार म्हणजे पाणी चोरी उघड करणाऱ्या आणि माहिती अधिकारात सर्व तपशिल उघड करणाऱ्यांना घरी जाऊन धमकावण्याचाही प्रकार झाला होता. वृद्ध पत्नीला व कुटुंबीयांना त्रास दिला गेला. पोलिसांनी तत्काळ संरक्षण दिले म्हणूनच धामणस्कर आणि सर्व जेष्ठांनी मिळून हे काम तडिस नेले.

दरम्यान, वयाच्या ७७ व्या वर्षी धामणस्कर यांनी शहराचे आपण काही देणे लागतो या भावनेतून हे काम केले. गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त धामणस्कर यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. अशाच प्रकारे शहारीतल काही कमर्शियल इमारतींमधूनही पाणी चोरी होत असणार ती थांबवा, अशी विनंती सर्व जेष्ठांनी केली आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम केलं हे नम्रपणे धामणस्कर यांनी नमूद केले.