काँग्रेसचे संघटन सृजन अभियान

2 Min Read

पिंपरी, दि. ७ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये संघटन सुजन अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची पक्ष बांधणी, संघटना मजबुतीकरण हा उद्देश लक्षात घेता या माध्यमातून शहराध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष निवडीचे मुख्य काम या अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यानंतर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व मेळावे घेण्यात येणार आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने या संघटन सृजन अभियानाची सुरुवात झाली असून यामध्ये विविध राज्यांमधील निरीक्षक व त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सह निरीक्षक असे एकत्रित रित्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडतील.

या अभियानाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरात देखील झाली आहे यासाठी निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशचे आमदार विनोद सुलतानपूरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी , पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार जयंत आंसगावकर यांची निवड केलेली आहे.

९ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी येथे या निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष पदासाठी व ब्लॉक अध्यक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी , फ्रंटल व सेलचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून तसा अहवाल राज्य व केंद्र समितीला पाठवला जाईल आणि यानंतर पक्षश्रेष्ठीं अंतिम निर्णय घेणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून शहर काँग्रेससाठी अध्यक्ष निवडीची प्रक्रियेला सुरुवात झाली असुन लवकर शहराध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे या माध्यमातून जिल्हा पातळीवर संघटनेची पुनर्रचना व नवनिर्माण करण्यास वेग येणार आहे.

 

Share This Article