आळंदीत अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई

0
3

दि.०६(पीसीबी)-आळंदी येथील इंद्रायणी घाटावर सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत अश्लील कृत्य करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता इंद्रायणी घाटा शेजारील मोकळ्या जागेत घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पाटील यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात दोन महिला आरोपींच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून नोटीस देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करून आणि शब्दांचा वापर करून नागरिकांना त्रास देत होत्या. यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.