गणेश जाधव शिंदेंच्या शिवसेनेत

0
2

दि.०६(पीसीबी)- कुठलेही काम होत नसल्याने शिवसेनेतील तळमळीचे कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित असलेले गणेश जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिंदेंंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

अजमेरा, मासुळकर कॉलनी या भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या परिसरातील गणेश जाधव हे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यावेळी उपनेते, सौ. सुलभाताई उबाळे. उपनेते, श्री. इरफान भाई सय्यद. पुणे जिल्हा प्रमुख, श्री राजू खांडभोर. नगरसेवक, शहर प्रमुख, श्री निलेश तरस.युवासेना कार्यकारणी सदस्य, श्री रुपेश कदम. युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख, श्री सागर पाचरणे . सह संपर्कप्रमुख, श्री निलेश मुटके व जिल्हाप्रमुख, श्री भगवान पोखरकर उपस्थित होते.