स्वातंंत्र्यसैनिक अब्बास इनामदार यांचे निधन

0
2

दि.०२(पीसीबी)-पिंपरी चिंचवड शहरातील नेहरुनगर येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक हज्जी अब्बास अब्दुल इनामदार (वय- ९८) यांचे मंगळवारी दि 31 मार्च 2026 रोजी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अक्सादी, चार मुले, तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शासकिय इतमामात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ते रहिवासी होते मात्र, गेली ५० वर्षे त्यांचे वास्तव्य पिंपरी चिंचवड शहरातच होते.