इंडोनेशियामध्ये सकाळी ७.४ रिश्टर स्केलता शक्तिशाली भूकंप

0
2

दि.०२(पीसीबी)-इंडोनेशियामध्ये गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी शक्तिशाली भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती, जी यापूर्वी नोंदवलेल्या 7.8 पेक्षा कमी आहे. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:48 वाजता मोलुक्का समुद्रात झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू टर्नाटे बेटाजवळ सुमारे 35 किलोमीटर खोलीवर होता. यानंतर आता इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाला सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.