दि.३०(पीसीबी)-“ज्यांचे घानिष्ठ संबंध होते, ज्या नेत्यांचं त्याच्याकडे जाणं-येणं होतं, बैठक होती, वारंवार त्याच्याकडे जायचे, त्याचा सल्ला घ्यायचे, त्याचे काही रेकॉर्ड आहेत. कोणत्या पक्षाचे किती आमदार आहे ते सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे याबाबतीत एसआयटी चौकशी सुरू आहे. योग्य ती चौकशी झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांचे घनिष्ठ संबंध होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुम्हाला सांगू. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आहेत. जे प्रमुख मंडळी आहेत आणि त्यांच्या आमदारांनी जे वक्तव्य केलं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. आमच्या पक्षात कुठे काही चर्चा नाही. याबाबतीत आम्ही सगळे शांत आहोत. संघटना कशी मजबूत करावी, यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रित काम करत आहोत, काही आमदार तशा भूमिका व्यक्त करत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत दिली.









































